भजनी मालिका

भजने

बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥ सर्व सिद्धी पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥ नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जने आम्हां ॥१॥ भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलोनियां येणें वाढविला डांगोरा । अंतरींचा केरा गुरुविण ॥१॥ संतांचा सन्मान कळेना जयासी । राहुनि देवापाशीं काय केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीस ॥१॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥ शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटणें । पुरींचें भ्रमण याच साठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं॥१॥ रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम