भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीस

bolavila deh apuleni haten | hutashilin bhuten brahmagnis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीस ॥१॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥ अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नाही ॥४॥ तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥