भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान

bramhadnyan tari eke divasin kale | tatkal ha gale abhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥ जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही ॥४॥