भजनी मालिका

भजने

बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥ बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥ सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥ जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥ तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥ दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम