भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलण्यासारिखे चाले जो सज्जन

bolanyasarikhe chale jo sajjan

रचनाकार: संत रामदास · अभंग
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन । तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान । तेथे माझे मन विगुंतले व्रुत्ति उदासीन स्वधर्मरक्षण । तेथे माझे मन विगुंतलें पूर्ण समाधान सगुण भजन । तेथे माझे मन विगुंतलें दास म्हणे जन भावार्थ – संपन्न।तेथे माझे मन विगुंतलें ।