भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना

bolavisi taisen anin anubhava | nahin tari deva vitambana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥ संपादणीविण मिटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥