भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलतां बोलु मावळला तो मावळोनि उरला

bolatan bolu mavalala to mavaloni urala

बोलतां बोलु मावळला तो मावळोनि उरला । तरि हा भावों केंवि गमलारे बापा ॥ कीं इंद्रियांचा भोगु खुंटला कीं समंधि याचा ठावो निमाला । कीं वर्णावर्णु भला विचारु नाहीं । तैसे आपुलेंचि करणें आपुलेंचि नवल । खेळ्या होउनि दावी रया ॥१॥ तपें अनेक विधी करावीं हे मनाची आधी । करितां करणें सिध्दि नव्हे नाहीं । म्हणोनि वाउगाचि वळसा पडे या धाडिवसा । तैसा कल्पनेचा फ़ांसा मायाबंधु ॥२॥ ऐसी याचा पाठी कां होसी हिंपुटी । नलगे तुज सुखाचा स्वादु या गोष्टी येणें ऐसेंचि विचारी ॥ एकुचि धीर धरी न लगे या द्वैतासाठी रया ॥३॥ म्हणोनि डोळियांचे देखणें लाघव तो देखणा जाणे । तेथें आपपर पिसुणें न देखे कांहीं ॥ तें शद्वेविणे बोलतां निशुद्वे ये हातां । ऐसा उपावो करी कांहीं । जोडिलिया धना वाढी बहु असें । तेथें वेचलें न दिसे कांहीं ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां सुखाचेनि सुखें राही । निवृत्तिरायें खुणा दाउनियां सकळ पुनरपि येणें नाहीं ॥४॥