भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव

bolache gaurav | navhe majha ha anubhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥ माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥ व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥ दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥ तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥