भजनी मालिका

भजने

ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥ एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं ॥१॥ कैसें तें बोलावें कैसें तें वानावें । वेदासही ठावें नोहे जेकां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥ रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव । भक्तहीन भाव अपुरता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥ परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥ चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥ ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ