भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो

bramhanand musavala | angi banala avirbhavo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो ॥१॥ संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥२॥ मन बैसलें ऐक्यासनीं । निश्चळ आसनीं सुखाचिये ॥३॥ निळा म्हणे लाभ ऐसा । जोडे सरिसा संतसंगे ॥४॥