भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती

bramharupachin karmen bramharup | virahit sankalpa hoti jati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥ तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥