भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली

bramhadikan na kale khol | te he akal dhariyeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥१॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥ उच्छिष्ट जे न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या ॥२॥ तुका म्हणे जोडी झाली । ते हे माउली आमुची ॥३॥