भजनी मालिका

भजने

बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥ नामाचा आठव हेचि सोपें वर्म । अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोधभानु तया नाहीं माध्यान्ह सायंप्रातर नाहीं तेथें कैंचा अस्तमान ॥१॥ कर्माचि खुंटलें करणेंचि हारपलें । अस्तमान गेलें अस्तमाना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥ दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलणें त्याचें तें नि:शब्द । देखणें देखती सच्चिदानंद । करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय बहमरुप ॥१॥ जाणें येणें आणिकां दिसें । अचळपणें तें जैसें तैसें । कल्लोळ सागरीं उससे । रश्मि जैसे निजबिंबीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा