भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें

bolanen ten amhi bolon upayogin | padilen prasangi kalaaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥ करणें तें आम्ही करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥२॥ तुका म्हणे असों आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें बोले सारूं ॥३॥