भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा

baisoni nivant karin chintan | kaya vacha manasahit deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥ नामाचा आठव हेचि सोपें वर्म । अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥ या परतें साधन आन कांहीं नेणें । अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥ सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणें भवासी उतार होय ॥४॥ चोखा म्हणे मज सांगितलें कानीं । राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥