भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनी एकान्ती । सांगती कोरड्या त्या गोष्टी

baisoni ekanti | sangati koradya tya goshti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनी एकान्ती । सांगती कोरड्या त्या गोष्टी ॥१॥ म्हणती करा रे भजन । आपण नेणें जैसा श्वान ॥२॥ म्हणे करा पंढरीची वारी । आपण हिंडे दारोदारी ॥३॥ ऐशियाचा उपदेश । एका जनार्दनें म्हणे नाश ॥४॥