भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला

baisoni kalambatalin | gadi milale sakalin | miloni gopalin | karati kala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥ वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥ लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीयां ॥४॥ एका जनार्दनीं म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं घ्यावा आधीं ॥५॥