भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोधावें सकळां गुरु प्रेममरें

bodhaven sakalan guru premamaren

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
बोधावें सकळां गुरु प्रेममरें । वर्णोनि चरित्रें श्रीगुरुचीं ॥१॥ फिरुनी स्त्रियां नरां विनवावेंसलगी ॥ स्वामीसेवें लागीं अभय दानां ॥२॥ शिबिका न्हाणी गाणीं विंजणे । चौफळा करावे मंगळ जयजयकारे ॥३॥ सुवासिनी करेंकुंकुम आरत्या । करव्या ब्रह्मादात्या सहस्त्र नित्य ॥४॥ कडुनि सहस्त्र विप्रा तुळसी विल्व पुष्पें । अर्पावें साक्षेपें नित्य नेमें ॥५॥ तांबुल विलास भोग वेळों वेळां । भोगावावा सोहळा श्रीतारका ॥६॥ पदार्थ शर्करा नवनीत दुग्ध । अर्पावा नैवेद्य क्षणोक्षणी ॥७॥ नेमें नित्य तीर्थें प्रसादे पावन । करावें विश्व संपुर्ण श्रीगुरुच्या ॥८॥ नसे गुरुवीण तीर्थ देव ब्रह्मा । नेणोनि मुढ वर्म शिणती वायां ॥९॥ म्हणे जनार्दन खुणेची गुज गोष्टी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥