भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले श्रीगुरुनाथ अथवा येती कळे

ale shrigurunath athava yeti kale

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
आले श्रीगुरुनाथ अथवा येती कळे । व्हावें उतावीळ जावें तेथे ॥१॥ आणावे सेवावें सर्वस्वे निरंतर । तरीचशिष्य येर जाती नरका ॥२॥ असो कांही काज हर्ष का संकट । समय प्राणांत होवो कांहीं ॥३॥ देवो कोणी ताप जावो देह प्राण । उडवो शीर आण शपथ वाहो ॥४॥ जावो देवो नये तारकासी कंही । पडो ब्रह्मांडही कोसळोनि ॥५॥ घाडलिया होय सर्वस्वाची बुड । पुरवावे कोड सर्व कांही ॥६॥ विकावे देहें धरुं नये लाज । साधावें निजकाज याचि देहें ॥७॥ घेवोनि शपथ होवोनि निर्भय । वरावे अक्षय तारकासी ॥८॥ दिधले देवें गात्र शक्ति हें वैभव । मन बुद्धी सर्व अंतरबाह्म ॥९॥ न मिळे न जन्म ऐसा हा पुढती । खोविल्या मागुती कांही केल्या ॥१०॥ नेमें नित्य निशी साठ घटीं आत । साधावे निजहित झटी एक ॥११॥ नसेचि सुलभ राजयोगा ऐसें । याचि देहीं दिसे देव डोळां ॥१२॥ एकांती अभ्यास निकट गुरुक्षेत्री । करावा बसोनि घरीं करु नये ॥१३॥ पुरुषें पत्‍नीसह करावा अभ्यास । घ्यावा उपदेश उमयतां ॥१४॥ आकारिली वस्तु रुपें स्त्रीपुरुष । एकचि प्रत्यक्ष मासे दोन ॥१५॥ म्हणोनि श्रौत स्मार्त योगयाग सर्व । करावें सर्वथैव पत्‍नीसह ॥१६॥ मोगोनि विलास साधावा राजयोग । हटी तो निहर्ग वसे वनी ॥१७॥ असोनिया पत्नी करोनये एकाकी । नेदावे कवतिकी तारकेही ॥१८॥ वदो नये निमित्त काम धंदा आळस । निर्वाहाचे मीष सच्छिष्येंही ॥१९॥ सेवनी प्रेमें सुखें राहोनी संसारी । व्हावे स्वयें हरी आपेंआप ॥२०॥ म्हणे जनार्दन साठवावा संपुटी । उघडी भ्रमताटीएकनाथ ॥२१॥