भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता

baisoni nishchal karin tyachen dhyan | deil to annavastradata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥ न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥ तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥