भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें

bramhadnyan jari kalen uthauthi | tari kan himputi vedashastren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥ शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटणें । पुरींचें भ्रमण याच साठी ॥ध्रु.॥ याचसाठी जप याचसाठी तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥ या च साठी संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥