भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हज्ञानाची भरोवरी । सांगे आपण न करी

bramhadnyanachi bharovari | sange apan na kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हज्ञानाची भरोवरी । सांगे आपण न करी ॥१॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ शिणवीली वैखरी ॥ध्रु.॥ कथा करी वरीवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥ तुका म्हणे कवित्व करी । मान लोभ हे आदरी ॥३॥