भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें

bolilon te dharma anubhav angen | kay pandurangen unen kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥ सर्व सिद्धी पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥ संतसमागमें अळंकारू वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजे ॥२॥ तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओवू ॥३॥