भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलों जातां वचनाक्षरें । माजी संचरे निरोपण

bolon jatan vachanaksharen | maji sanchare niropan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलों जातां वचनाक्षरें । माजी संचरे निरोपण ॥१॥ ऐशी दाटली दाटणी । वाचा गुणी गुंडाळिली ॥२॥ नाना संकल्प ते मुराले । स्तवनींचि झाले सादर ॥३॥ निळा म्हणे निमिषोनिमिष । झाले श्वासोश्वास अक्षरें ॥४॥