भजनी मालिका

भजने

पाईकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥ पाइकीवांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥१॥ येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टि वरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥ नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाउले गोजिरीं ध्यान विटे मिरवले । शोभते तान्हुले यशोदचे ॥१॥ न कळे पुरणां शास्त्रादि साम्यता ॥ तो हरी तत्त्वतां पढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥ कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पांगुळ झालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे । काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं ॥१॥ प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥ कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पांचमुखीं रुद्र स्वयें करी स्तुति । चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा ॥१॥ देवी देव सर्वा विस्मयो पावती । विठोबाची ख्याति कोण वानी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांचा जाणाचें । आणिलें जयाचें । मिरवण तयाचें । कोण सुख ॥१॥ नवल विस्मयो कैसा । देखत देखत झांसा । मृगजळाची आशा । केवीं आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पांचा सातांचा आहे येक जागां मेळा । देताती कवळा येकयेकां ॥१॥ करू पाहातां मज जिताची विटंबना । म्हाणोनी नारायेणा पळोनी आलों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव