भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों

pakhandayanni pathi puravila dumala | tethen mi viththala kay bolon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥ कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥ न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥ तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥ तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥