भजनी मालिका

भजने

पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥ नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥ बहुतां दिधला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥ त्याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥ जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पांडुरंगा नमूं परात्परा नमूं । सगुणासी नमूं साक्षिभूता ॥१॥ समस्त संबंध साधियेले हरी । रावणादि वैरी उद्धरिले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांडुरंगाचें नाम बरवें । आवडी घेतली माझ्या जीवें ॥१॥ कैसा देहुडा पाउलीं उभा । वेणुनादीं गोपाळ वेणु वाहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥ आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पांडुरंगें प्राप्त होईल सकळ । चरणकमळ ध्यारे मनीं ॥१॥ मनीं मानसिक न करावा कधीं । नाम घ्यारे आधीं केशवाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥ कनवाळू कृपाळू भक्तंलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम