भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा

pandurangavachoni duja kon sakha

रचनाकार: संत बंका · अभंग
पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ वंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥