भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या भक्तांचा धरोनी अभिमान

apulya bhaktancha dharoni abhiman

रचनाकार: संत बंका · अभंग
आपुल्या भक्तांचा धरोनी अभिमान । सगुण निर्गुण रूप धरी ॥१॥ जयाची वासना तेची पुरवीत । उभा राहे तिष्ठत बळिचे द्वारी ॥२॥ विदुराचे घरी आवडी खाय कण्या । धांवतसे धांवण्या भाजी पाना ॥३॥ वंका म्हणे अंबऋषीकारणें । दहा जन्म घेणे गर्भवास ॥४॥