भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाधीच्या भेणें आलोंसे शरण

upadhichya bhenen alonse sharan

रचनाकार: संत बंका · अभंग
उपाधीच्या भेणें आलोंसे शरण । कायावाचामने सहित देवा ॥१॥ तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं माझें गणगोत पंढरिराया ॥२॥ तुं माझी साउली तू माझी माउली । प्रेमाची माउली तूंचि माझी ॥३॥ वंका म्हणे तुज विकिला जीवप्राण । काया वाचा मन सत्य देवा ॥४॥