भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी

apuliya brida apan sambhali

रचनाकार: संत बंका · अभंग
आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी । तूंचि माझा बळी मायबाप ॥१॥ तुम्हांविण कोणा जाऊं मी शरण । कांहो अभिमान नये माझा ॥२॥ हीन याती दीन पतीत आगळा । म्हणोनि कळवळा नये माझा ॥३॥ वंका म्हणे अहो पंढरीनिवासा । तुजविण आशा दुजी नाहीं ॥४॥