भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तो जातीचे आहेती महार

amhi to jatiche aheti mahar

रचनाकार: संत बंका · अभंग
आम्ही तो जातीचे आहेती महार । तुम्हीं तो थोर उंच वर्ण ॥१॥ अन्नपाणी देता निंदितील जन । करतील ताडण मजलागीं ॥२॥ ऐंकोनियां मात येरू बोले वचन । यातीसी कारण नाही मज ॥३॥ माझा तूं वाचवी अन्न देऊनि प्राण । पुढील कारण पाहूं नको ॥४॥ ऐकोनी उत्तर सोयरा उठली । घरामध्यें आली लवलाहीं ॥५॥ दही आणी भात घेतला वाटीभरीं । आणोनिया करीं दिला तिने ॥६॥ वंका म्हणे हरी खावोनी तुष्टला । म्हणे माग मला देतों तुज ॥७॥