भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगे पांडुरंगे । वेगीं येंई माझे गंगे

pandurange pandurange | vegin yeni majhe gange

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पांडुरंगे पांडुरंगे । वेगीं येंई माझे गंगे ॥१॥ तुजवांचूनि मजला । कोण सांभाळी दयाळा ॥२॥ तूंचि आमुचा आधार । धांवूनि येंई बा सत्वर ॥३॥ निळा म्हणे पांढुरंगा । घेंई बाळा तूं वोसंगा ॥४॥