भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या

pandurang mhane sakhya nivruttiraja | jhada atan sheja samadhichya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥ नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥ परिसा भागवत चांगदेव हातें । आणिलें साहित्य समाधींचें ॥३॥ तुळसी बुका बेल दर्भ आणि फुलें । उदक चांगलें भोगावतीचें ॥४॥ भस्म पितांबर भगवीं तीं वस्त्रें । योगी दिगंबर समागमें ॥५॥ नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६॥