भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचांची वाट पांचांसवे गेली

panchanchi vat panchansave geli

पांचांची वाट पांचांसवे गेली । येरासि जाहली देशधडी ॥१॥ अकरावें होतें धरुनियां नेलें । बारा तेरा गिळिलें धन माझें ॥२॥ रखुमादेविवरु चोळु पैं घोटिला । निधन जाहाला शुध्दपणें ॥३॥