भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचमुखीं रुद्र स्वयें करी स्तुति । चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा

panchamukhin rudra svayen kari stuti | chahu mukhi kirti varni brahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांचमुखीं रुद्र स्वयें करी स्तुति । चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा ॥१॥ देवी देव सर्वा विस्मयो पावती । विठोबाची ख्याति कोण वानी ॥२॥ परीक्षितीसाठीं प्राण त्यजी सर्व । रावणाचा गर्व स्वयें हाणी ॥३॥ नामा म्हणे तुज सकळ समान । माझे दोष गुण मानी काय ॥४॥