भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू

panch panchacha miloni melu | sadashiv mhanati amangalu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥ कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥ विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥ एका जनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥