भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं

panch divas utsav kela nivruttisi | kala amavasyesi tryambakeshvarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं ॥१॥ प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥ कांहीं ऋषीश्वर राहियेले तेथें । गेले बहुत ते आळंकापुरीं ॥३॥ गरुडावरी सिद्ध जाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वाचीं ॥४॥ नामा म्हणे देवा जावें आषाढीसी । आले एकादशी पंढरीये ॥५॥