भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥ बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥ झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुज कैसें जाणवेगा देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥ सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥ डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय ते विरक्ती न कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥ नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण ॥१॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरीष्ठ तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय दिवस गेले अवघे चि वराडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम