भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥ नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ध्रु.॥ आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥ पडिलें हें दिसे ब्रम्हांड चि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥ ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥ हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥१॥ अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥ मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें ॥१॥ भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कटपट । घात बळकट मांडियेला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥ कोपला पाटील गांविचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥ उताविळ झालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम