भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज

kay kirti karun lok dambh man | dakhavin charan tujhe maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥ होईल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ती गोड देवा ॥४॥