भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी

kay janen mi pamar panduranga tujha par | dhariliya dhir kay ek na karisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥ उताविळ झालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥ तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥