भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें

kay karun an daivaten | eka vin pandharinathen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥ अनेक दीपीका प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥ तुका म्हणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥