भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती

kay karun ya mana atan | ka visaraten pandharinatha | kari sansarachi chinta | velovelan maguti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥१॥ अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥ध्रु.॥ भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥ बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ॥३॥ किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥ मज राखें आतां । तुका म्हणे पंढरिनाथा ॥५॥