भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी

kay karun na kari dhanda | chitta govinda tujhe payi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥ ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ध्रु.॥ कुटुंबाचा तुम्हां भार । मज व्यवहार निमित्त ॥२॥ तुका म्हणे करितां काम । हृदयीं नाम धरीन ॥३॥