भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां

kay tujhe upakar panduranga | sangon mi ya jagamaji atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥ घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥ तुका म्हणे याच्या उपकारासाठी । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥