भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण

kay ten samarthya na chale ya kalen | kay jalin balen shaktihin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण ॥१॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरीष्ठ तें ॥ध्रु.॥ काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणे गोविंदा लाजतसां ॥२॥ तुका म्हणे काय ब्रिदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥