भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या

kay tin karavin molachin makaden | nachat ti pudhen sansarachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥ झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥ हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥ तुका म्हणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥