भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुज कैसें जाणवेगा देवा । आणावें अनुभवा कैशा परी

kay tuj kaisen janavega deva | anaven anubhava kaisha pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुज कैसें जाणवेगा देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥ सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझे ॥ध्रु.॥ कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥ तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥३॥