भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कारणा कारण वारीयेलें जेथें । जातों तेणें पंथे संतसंगे ॥१॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥ लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळ जवळचि उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काळा च सारिखीं वाहाती नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तीसंहारघडमोडी ॥१॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥ कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां । अल्पसुखासाठी पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कावळिया नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळते ॥१॥ तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम